‘मी पण सावरकर’ म्हणत भाजपा आमदार विधीमंडळात आक्रमक

नागपूर प्रतिनिधी | नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपानं यावेळी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे . राहुल गांधींनी हे सांगून … Read more

मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती – चंद्रकांत पाटील

आजचं चित्र जरी वेदना देणारा असलं तरी मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’; चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ असा सज्जड दम पाटील यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.

माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळं माफी मागणार नाही;राहुल गांधींनी केला भाजपवर पलटवार

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी देशात भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचे सांगत मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हे करत असताना राहुल यांनी भाजपसाठी लोकप्रिय असलेल्या मेक इन इंडिया या घोषणेचा विपर्यास करत ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला होता. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने करत राजकारण तापवलं असताना. राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान राहुल यांनी हे विधान केलं.

मी पंकजा मुंडेंच्या मागे होतो, आहे आणि राहील; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहेच,

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना पत्र; करून दिली जुनी आठवण

शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांग्लादेशी घुसकोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांग्लादेशी नागरिकांनी घुसकोरी केली आहे.

‘खडसेंना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले असते, तर भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का?’

‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर काँग्रेसने लगावला टोला

राज्यातील इंटरनेट सेवा बंद असतांना देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विटरवरून आसामच्या जनतेला शांततेत आवाहन केलं आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून काँग्रेसने मोदींना ट्विटरवर कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला.

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं; खासदार काकडेंची पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका

काल गोपीनाथगडावर पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं म्हणत खासदार काकडेंनी पंकजा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.