पुण्यात मनसेला ‘राज’गर्जनेसाठी अखेर मैदान मिळालं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली.

‘शेकाप’च्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.

नाशिकमध्ये भुजबळ पिता-पुत्रांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेने आखली मोठी ‘रणनीती’  

नाशिक प्रतिनिधी। जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर निवडणूक लढवत असून, या ९ जागांवरील प्रचाराचे नियोजन शिवसेनेकडून पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी दिंडोरी, नांदगाव आणि येवला मतदारसंघांत जाहीर सभा घेणार आहेत. नांदगाव आणि येवल्यात सभा ठेवून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेनेने भुजबळ पिता-पुत्रासमोर दंड थोपटले आहे. … Read more

दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.

दहशतवादाविरुद्ध भारत आता अधिक आक्रमक – एअर चीफ मार्शल भादुरीया; वायुसेना दिवसानिमित्त देशभर उत्साह

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मित्रपक्षांचा गेम करत भाजपने बळकावल्या परभणीतील २ जागा; ४ मतदारसंघात ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.