बीड | स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अपघातात निधन होऊन पाच वर्षे होत आली तरीही बीड करांच्या मनात गोपीनाथ मुंडे हे व्यक्तिमत्व अजून कायम आहे. पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील भावनिक ऋणानुबंधाचा प्रत्यय आजवर अनेकवेळा महाराष्ट्राला अनुभवायला मिळाला आहे. अशीच एक घटना आज गुरुवारी बीडकरांना अनुभवायला मिळाली. ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे परळीवैजनाथ येथे गोपीनाथ गडावर गेल्या असता त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांना आवडत असणारे पेरुचे फळ समाधीवर ठेवून दर्शन घेतले. यामुळे तिथे उपस्थित असणार्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या.
गुरुवारी सकाळी बीड दौर्यावर असलेल्या पंकजा मुडे यांनी परळी वैजनाथ येथील गोपीनाथ गडाला भेट दिली. यावेळी तेथील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे पंकजा यांनी दर्शन घेतले. दरम्यान त्यांनी गोपीनाथ गडावरील पेरुच्या झाडाचा एक पेरु समाधीवर ठेवला. गोपीनाथ मुंडेना आंबा, पेरू, जांभूळ अशी फळ मनापासून आवडत असत म्हणूनच मी पेरूचे फळ स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समाधीवर ठेवल्याचं ट्विट पंकजा यांनी केलं आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आंबा, पेरु, जांभळे अशी फळे मनापासून आवडायची आणि म्हणूनच गोपीनाथ गडावर फळझाडाची लागवड केली असल्याचं पंकजा यांनी सांगितलं.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना आंबा, पेरू, जांभळे अशी फळे मनापासून आवडायची म्हणून गोपीनाथगड येथे फळझाडांची लागवड केली आहे पेरूचे झाड चांगले बहरात आले आहे आज गोपीनाथ गडावर दर्शनासाठी आले असताना याच पेरूच्या झाडावरील पेरू काढून तो मुंडे साहेबांच्या समाधीवर ठेवला आणि दर्शन घेतले pic.twitter.com/au6Wi6AJkk
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) December 6, 2018