पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार निवडणूक लढणार आहेत. पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी १७ मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेला सुरवात झाली. या सभेत पार्थ पवार यांनी आपले राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण केले. यावेळी ते बरेच गोंधळले होते, त्यामुळे सोशल मेडियावर त्यांची हिल्ली उडविण्यात येत होती.
चिंचवड येथील प्रचार सभेत पार्थ यांनी तीन मिनिट भाषण केले, या तीन मिनिटाच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले. अनेक वेळा ते गडबडले. पार्थ यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर हीच चर्चा सुरु झाली आहे. ‘पार्थ पवार यांच्या भाषणावरुन खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या’, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार यांच्या भाषणावरुन त्यांना केवळ घराणेशाहीमुळेच उमेदवारी मिळाल्याचा आरोप होत आहे. पार्थ यांच्या पहिल्या भाषणावर सोशल मीडियावरून टीका होत आहे, मात्र काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी त्यांची बाजू घेतली आहे. पार्थ पवारच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागतो! लंबे रेस का घोडा है..याद रखना!!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं.
इतर महत्वाचे –
म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात विवेक ओबेरॉय दिसेल ‘या’ विविध रूपांत