म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

2
72
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरात तळ ठोकून बसले आहेत. अशात एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने प्रकाश आंबेडकर यांना मायावतीच्या राजकारणावर प्रश्न विचाराताच प्रकाश आंबेडकर यांनी त्या प्रश्नाचे उत्तर  देणे टाळले आहे.

तुम्ही दलित राजकारणातून पुढे आलेले नेते आहेत आणि उत्तर प्रदेशात मायावती देखील दलित राजकारणातून समोर आलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते असा प्रश्न पत्रकाराने विचारताच प्रकाश आंबेडकर यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे.

मी  महाराष्ट्रात राजकरण करतो आपण मला उत्तर प्रदेशचा प्रश्न विचारत आहेत असे प्रकाश आंबेडकर प्रथम म्हणाले. त्यानंतर त्यांनी मायवतींच्या राजकारणाचे परीक्षण करणारा कोण आहे. त्यांच्या राजकारणाचे परीक्षण तेथील जनता करेल असे म्हणाले आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मायावतीच्या बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी मायावती यांच्यावर थेट टीका करणे टाळले आहे असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here