Wednesday, June 7, 2023

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

नंदुरबार  प्रतिनिधी | नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत बंडाळी माजल्याने या ठिकाणी खासदार हीना गावित यांना आपली जागा गमवावी लागणार आहे असे चित्र सध्या दिसते आहे. भाजपचे निष्ठावान नेते डॉ.सुहास नटावदकर यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली  आहे.

निष्ठावान लोकांच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या  शब्दामुळे आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही असे सुहास नटावदकर यांनी  आधीच जाहीर केले आहे.   त्यामुळे या सर्व प्रकारावर तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन  हेलीकॉप्टरने नंदुरबार मध्ये दाखल झाले होते.  मात्र पक्षांतर्गत बंडाळीला तोडगा काढण्यास गिरीश महाजन यशस्वी झाले नाहीत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून देशभर प्रसिद्ध होता. त्या ठिकणी २०१४ साली स्वातंत्र्यानंतर प्रथमच हिंदुत्ववादी पक्षाला विजय मिळाला होता. मात्र भाजपमध्ये उफाळलेल्या अंतर्गतवादामुळे हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra 

महत्वाच्या बातम्या 

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

योगी आणि मायावतींच्या प्रचार कार्यावर निवडणूक आयोगाने घातली बंदी

नरेंद्र मोदींची अकलूज येथील सभा रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी

सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर म्हणतात…..

प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

पर्रीकरांवर पवारांनी केलेल्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर