सांगली प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या गाडीचे सारथ्य केले. दिघंची येथे आयोजित युवा शेतकरी मेळाव्याला पवार यांनी आज उपस्थिती लावली. यावेळी अंजनी ते दिघंची असा प्रवास पवार आणि पाटील यांनी एकाच गाडीतून केला.
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे युवा राष्ट्रवादी कॉंग्रेस ने युवा शेतकरी मेळाव्याचे आजोजन केले होते. त्यासाठी रोहित पवार व रोहित पाटील यांना निमंत्रित केले होते. दरम्यान पवार हे सकाळीच सांगली मध्ये पोहोचले. त्यांनी आर.आर. पाटील यांच्या कुटुंबियांची चौकशी करत त्यांना आधार दिला. त्यानंतर आबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन ते शेतकरी मेळाव्यास पोहोचले.
दिघंची येथील सभेस रोहित पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, अर्जून पाटील, कल्लपा कुटे, ताज्जुदिन तांबोळी, भरत देशमुख, बाबासाहेब मुळीक, स्वप्नील जाधव, हणमंतराव देशमुख, जयमाला देशमुख, अमित अहिवळे, दिपक उनउने आदी मान्यवर उपस्थित होते. युवक मेळाव्याचे आयोजन रोहित देशमुख व राष्ट्रवादी पक्षाचे युवक कार्यकर्ते यांनी केले होते.
इतर महत्वाचे –
इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक
शरद पवारांसाठी या १३ व्यक्ती आहेत खास, अजित पवारांचा समावेश नाही
रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?