पावसाळा संपला तरी बेडकांची डरावडराव संपली नाही ; शिवसेनेनं पुन्हा साधला राणेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील कलह दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार काल नारायण राणे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत पाणउतारा केला. त्यावर आता परत शिवसेने कडून प्रतिक्रिया आली आहे. पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, ‘येत्या काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन’, असं विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. राणे कुटुंबाच्या वाटेला जाऊ नका नाहीतर मातोश्रीच्या आत-बाहेर काय चालतं हे सगळं बाहेर काढीन आणि ते तुम्हाला जड जाईन, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

राणेंच्या टीकेवर विनायक राऊत म्हणाले, “पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावडराव गिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डराव-डराव गिरीला कोणी घाबरत नाही. येत्या काही काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन.

शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये आता चांगलंच युद्ध रंगल आहे. दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता पुत्रांवर तोफ डागली तसंच त्यांना बेडकाची उपमा दिली. त्यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तुमची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही. आपण पुळचत मुख्यमंत्री आहात, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook