मुंबई । परळीतील पूजा चव्हाण ( Pooja Chavan Suicide Case) या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे एक मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी याप्रकरणी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं सातत्याने हा मुद्दा उचलून धरला असतानाच भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं पत्र भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठवलं होतं. त्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप लावला आहे. भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप त्यांनी केला.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
तर दुसरीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं,’ असं वाघ यांनी म्हटलं आहे.
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो
जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं👊@BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
दरम्यान, पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहेत. यात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे होता. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.