Pooja Sawant Engagement : ‘मला वाटलं नव्हतं मी इतकं प्रेम करू शकते…’; पूजा सावंतच्या साखरपुड्यातील सुंदर व्हिडीओने वेधलं लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच १६ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला. अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या साखरपुड्यानंतर अनेक तरुणांची हृदय तुटली. मात्र पूजाचं हृदय सिद्धेश चव्हाणने जिंकलं आणि आता लवकरच पूजा मिसेस चव्हाण होणार आहे. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यातील अनेक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच पूजाने तिच्या साखरपुड्यातील एक खास व्हिडिओ अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दरम्यान नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला आणि या खास सोहळ्यासाठी पूजाचे सिने विश्वातील अनेक मित्रमंडळी उपस्थित होते. (Pooja Sawant Engagement) पूजाच्या आयुष्यातील हा अत्यंत खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पूजा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अर्थात सिद्धेशला प्रेमाने लग्नाची मागणी घालताना पाहायला मिळतेय. यावेळी पूजाने सिद्धेशला सर्वांसमोर लग्नासाठी मागणी घातली आहे.

(Pooja Sawant Engagement)पूजा सावंतने शेअर सर्व पाहुण्यांसमोर म्हटले की, ‘तेव्हा कुठेतरी प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता. मला कधीच नव्हतं वाटलं की, मी कोणावर इतकं प्रेम करू शकते. तू आलास अन् माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू मला लग्नासाठी विचारलं नसतं, तर मी स्वत:हून तुला लग्नासाठी नक्कीच विचारलं असतं. आज सगळ्या कुटुंबीयांसमक्ष मी तुला विचारते…माझ्याशी लग्न करशील का?’ पूजाने अशा रोमँटिक पद्धतीने लग्नाची मागणी घातल्यानंतर भारावलेला सिद्धेश तिला घट्ट मिठी मारतो.

यावेळी सिद्धेश चव्हाण आणि पूजा सावंत यांच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते. भूषण प्रधान, गश्मीर महाजनी त्याची पत्नी गौरी महाजनी, प्रार्थना बेहेरे आणि तिचा पति अभिषेक जावकर, तसेच वैभव तत्ववादी, फुलवा खामकर असे मराठी कला विश्वातील अनेक कलाकार मंडळी यावेळी उपस्थित होते. पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यातील व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आता चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Pooja Sawant Engagement) येत्या काही दिवसातच पूजा आणि सिद्धेश लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांच्याही घरी जोरदार लगीन घाई सुरू आहे. इतकेच नव्हे तर पूजाच्या संगीत आणि मेहंदी सोहळ्यासाठी तिचे जवळचे मित्र मैत्रीण एका खास डान्सची तयारी करत आहेत.