हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून भारत जोडो यात्रा काढली जात आहे. गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून भाजपच्या नेत्या, खासदार पूनम महाजन यांनी टीका केली. टीका करताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले. “यांचे नाव गांधी, पण काम गंदगीचं ! मी राहुल गंदगीच म्हणणार,” असे महाजन यांनी म्हंटले.
मुंबईत खा. पूनम महाराज यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी चांदिवली विधानसभेच्या जाहीर सभेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाषणातून राहुल गांधी व ठाकरे गटावर टीका केली. त्या म्हणाल्या की, स्वातंत्रवीर सावरकर असतील किंवा नेहरू असतील, आम्ही कधीच कुणाच्या विरोधात बोलत नाही. आणि राहुल गांधी सावरकरांवर बोलले. त्यांचे राहुल गांधी हे नाव असू नये, एवढी घाण राजकारण त्यांनी बनवली आहेत. त्यांना राहुल गांधी ऐवजी राहुल गंदगी हणून नाव ठेवायला पाहिजे, असा तो माणूस आहे.
माझ्या महाराष्ट्रात येऊन सावरकरांविरोधात ते बोलतात आणि आपण सर्वजण गप्प बसतो. ते गप्प बसतात जे म्हणतात आम्ही हिंदुत्वावर विचार करो. हि तुमच्या विचारधारा. आम्ही तर देशहितासाठी पीडीपीला धुडकावून लावले. तुम्ही तुमच्या विचारधारेसाठी काँग्रेसला धुडकावून लावाल की नाही? त्याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न महाजन यांनी शिवसेनेला विचारला.