ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर पोलीस वसाहतींच्या नवीन बांधकामाबाबत सकारात्मक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्याचे वाढते नागरीकरण व लोकसंख्या लक्षात घेता पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्राधान्याने करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या कामात सुसूत्रता येईल. तसेच ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर या ठिकाणच्या पोलीस वसाहतींचे बांधकामाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात पोलीस अधिक्षक कार्यालयाचे नवीन इमारत व सातारा जिल्ह्यातील पोलीस वसाहतींच्या नवीन बांधकामाबाबत राज्यमंत्री गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला अपर पोलीस महासंचालक, नियोजन व समन्वय संजय वर्मा, अति. महासंचालक, गृहनिर्माण अर्चना त्यागी, सातारा पोलीस अधिक्षक अजय बन्सल, वित्त विभागाचे अवर सचिव श्री. कातकाडे यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा पोलीस अधिक्षक कार्यालयाची सध्याच्या इमारतीचे बांधकाम हे सन 1913 सालचे ब्रिटीशकालीन असून ही इमारत तत्कालीन गरजेनुसार बांधण्यात आलेली आहे. सध्या सातारा जिल्ह्याचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या या बाबी विचारात घेवून जिल्हास्तरावर सुसज्ज अशी पोलीस अधिक्षक कार्यालयाची इमारत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या मालकीच्या असलेल्या सातारा येथील मल्हारपेठ येथे उपलब्ध जागेत नवीन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित करण्यात यावे. तसेच सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी, कोरेगांव, म्हसवड व मसूर या ठिकाणी पोलीस वसाहतींचे बांधकाम होणे आवश्यक आहे. पोलीस वसातींचे काम करण्याबाबतही कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत दिल्या.

Leave a Comment