हिवाळ्यातील थंडीच्या दिवसातील सकारात्मक आहार योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिवाळ्याच्या दिवसात अगोदरच थंडी असते .त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात अगदी गरम पदार्थ खाण्याकडे जास्त भर द्यावा. शरीरातील तापमान हे हिवाळ्याच्या दिवसात कमी राहते कारण आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या शरीरावर प्रभाव पडत असतो. हिवाळ्याच्या दिवसात शरीरात अनेक बदल होतात. यामुळे आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. गरम आणि उषा पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.

यासाठी योग्य आहार फायदेशीर ठरतो. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. हिवाळ्यात कोणत्याही थंड पदार्थाला हात लावू नये. आइस्क्रीम , कोल्ड कॉफी , कोणतेही थंड पेय या गोष्टी आहारातून टाळाव्यात. हिवाळ्यात आपल्या आहार विहारच्या सवयी बदलल्यामळे वजनही वाढू शकते. आपण रोजच्या आहारात कश्या प्रकारे बदल करू शकतो व हिवाळ्यात देखील शरीरात ऊर्जा जोमाने वाढेल व आपण कार्यशील राहू यासाठी कोणते उपाय करता येतील याचा विचार करूया.

— गोड पदार्थ, शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ याचं सेवनही प्रमाणातच करावं. सर्दी, खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.

— या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. तेलकट पदार्थ, ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.

— संत्री, द्राक्षं अशी फळांमध्ये क जीवनसत्त्वं असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.

— हिवाळ्यात लसूण खाणं चांगले. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

— गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा.

— हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.

— ग्रीन टीचे सेवनही थंडीत उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी ऍक्‍सिडंट्‌स असतात. यामुळे अनेक बॅक्‍टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटीऍक्‍सिडंट मदत करतात.

— आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश केला जावा. त्यामध्ये पण उष्णता हि जास्त असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’