सकारात्मक ! ग्रामीण भागात आजपासून पाचवी ते सातवी शाळांच्या वाजणार घंटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे तसेच लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आज पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली आहे.

शिक्षक दिनानिमित्त शहरातील एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात आयोजित आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले त्यांनी केलेल्या या घोषणेचे जिल्हाभरातील शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक करताना शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी आज सर्वांना गुड न्यूज देणार आहेत असे म्हटल्यावर सभागृहातील सर्वांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटने म्हणाले की आठवी ते बारावी चे वर्ग ग्रामीण भागात सुरू होते. आता पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून पाचवी ते सातवीचे वर्ग ही ग्रामीण भागात सुरू केले जाणार आहेत. ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी आता प्रत्येकाची जबाबदारी देखील वाढली आहे. कोरोना ची दिलेली नियमावली काटेकोरपणे पाळावी लागेल. ज्या शिक्षकांनी लसीचा डोस घेतलेले नाहीत त्यांनी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी व निगेटिव्ह अहवाल घेऊनच शाळेत यावे. असेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी सांगितले.