हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आहे.आकडेवारीनुसार ४० ते ४५ टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आढळून येत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना मिनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईतील रुग्णसंख्या चारपटीने वाढत असून हे चिंताजनक आहे. त्यामुळे मिनी लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यानंतरही रुग्णसंख्या वाढत राहिली. तर आपल्याला पूर्ण लॉकडाऊनचा विचार करावा लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योग्य निर्णय घेतील असेही त्या म्हणाल्या.
मुंबईत ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यांच्यावर उपचार करण्यास पालिका सक्षम आहे. मात्र नागरिकांनी काळजीपूर्वक वागावं असेही आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले असून ओमायक्रॉनचा प्रसारदेखील मुंबईत वेगाने होत आहे.