पुणे : हॅलो महाराष्ट्र – मागच्या 2 वर्षांत कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. यानंतर काही काळाने कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर आता पुन्हा एकदा चिंताजनक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले कि, SARS-CoV-2 विषाणूच्या Omicron प्रकाराच्या XBB उप-प्रकारामुळे काही देशांमध्ये कोरोना संसर्गाची आणखी एक लाट येऊ शकते. पुण्यात विकसनशील देश लस उत्पादक नेटवर्क (DCVMN) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी हि माहिती दिली.
काय म्हणाले डॉ. स्वामीनाथन?
“Omicron चे 300 हून अधिक उप-प्रकार आहेत. मला वाटतं सध्या चिंतेची बाब म्हणजे XBB, जो एक रीकॉम्बिनंट व्हायरस आहे. आम्ही याआधी काही रीकॉम्बिनंट व्हायरस पाहिले आहेत. ज्याच्या पुढे रोगप्रतिकारक शक्तीही कमी पडते, याचा अर्थ अँटीबॉडीज देखील त्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे XBB मुळे काही देशांमध्ये संक्रमणाची नवीन लाट आपल्याला हळूहळू दिसू शकते.”
म्युटेशनमुळे हा विषाणू अधिक संसर्गजन्य होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याला सामोरे जाण्यासाठी डॉ.स्वामिनाथन यांनी यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आणि देखरेखीचा सल्ला दिला. तसेच संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्यास सांगितले. आतापर्यंत कोणत्याही देशाकडून असा कोणताही डेटा प्राप्त झालेला नाही, ज्यावरून असं दिसून येतं की संसर्गाचा हा नवीन प्रकार अधिक गंभीर आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय