नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एम्सचे डॉ. गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक शहा यांच्यावर उपचार करत आहेत.
एम्सचे संचालक आणि तज्ज्ञ डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या निरिक्षणाअंतर्गत सध्या शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील २४ तासांसाठी त्यांना निरिक्षणाअंतर्गत ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी कोरोनावर मात केली. जवळपास २ आठवडे कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती.
याआधी २ ऑगस्टला आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली, तरी अमित शाह यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. पण खबरदारीचा उपाय म्हणून अमित शाह मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”