Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : दररोजच्या आयुष्यातील धावपळीमुळे आणि जीवनशैलीतील अनियमिततेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सोमरे जावे लागत आहेत. अशा परिस्थितीत कधीही मेडिकल एमर्जन्सीचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गरज अनेक पटींनी वाढली आहे. मात्र दरवर्षी भरावा लागणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त असल्याने सामान्यतः लोकांकडून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास टाळाटाळ केली जाते. Post Office

PPF, Senior Citizen Savings Scheme Offering Better Returns Than Bank FDs? Know In Details

सध्याच्या महागाईच्या काळात हेल्थ इन्शुरन्सची गरज आणि लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसने एक उत्तम प्लॅन सादर केला आहे, तिचे नाव आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसी. या पॉलिसीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर विमाधारकाचा अपघात झाला तर हॉस्पिटलायझेशनचा खर्च दिला जाईल. Post Office

What is Health Insurance | Defination, Types & Benefits|Max Life Insurance

तसेच याअंतर्गत हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान 60 हजारांचा ओपीडी खर्च आणि 30 हजारांचा क्लेम देखील मिळेल. हे लक्षात घ्या कि, या प्लॅनमध्ये 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह 10 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हर उपलब्ध असेल. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा एआयजी यांच्यामध्ये नुकताच एक करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत 18 ते 65 वयोगटातील लोकांना या इन्शुरन्सचा फायदा घेता येईल. या अंतर्गत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास, तसेच कायमचे किंवा अंशतः अपंगत्व आल्यास आणि अर्धांगवायू झाल्यास मेडिकल कव्हरमध्ये 10 लाख रुपये दिले जातील. या पॉलिसीला दरवर्षी रिन्यूअल करावे लागेल. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विमाधारकाचे खाते असणे आवश्यक आहे. Post Office

Corporate Health Insurance - Should you rely on it?

त्याच वेळी, इंडिया पोस्टच्या 399 रुपयांच्या या हेल्थ इन्शुरन्स योजनेत काही इतर फायदे देखील देण्यात आले आहेत. यामध्ये 2 मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाखांपर्यंतचा खर्च, 10 दिवसांसाठी रुग्णालयात भरतीसाठी प्रतिदिन एक हजार रुपये, आदीचा समावेश आहे. Post Office

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/DOP_PDFFiles/Final_PMSBY_Consent_Cum_Declaration_Form.pdf

हे पण वाचा :

Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवे दर पहा !!!

Credit Card वर EMI करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात घ्या !!!

‘या’ प्लॅनअंतर्गत Vodafone Idea कडून दिला जात आहे 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा !!!

ICICI Bank च्या खातेदारांना WhatsApp द्वारे उपलब्ध होणार ‘या’ सुविधा