व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Multibagger Stock : ‘या’ केमिकल फार्मा कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : खास रसायन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये आरती इंडस्ट्रीजचे नाव समाविष्ट आहे. गेल्या पाच वर्षांत आरती इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना चार पट रिटर्न मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी 2.56 रुपये किंमत असलेल्या या शेअर्समध्ये 34,877 टक्क्यांनी वाढ होऊन 895.40 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. म्हणजेच त्या वेळी या कंपनीत कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये झाली असती.

Speciality Chemicals and Pharmaceutical Manufacturers India | AIL

गेल्या 10 वर्षांत किंमती 45 पट वाढल्या

गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर या कालावधीत या शेअर्सची किंमत 45 पटीने वाढली आहे. आजपासून दहा वर्षांपूर्वी या शेअर्सची किंमत 19.69 रुपये होती. जर त्यावेळी कोणी त्यामध्ये गुंतवणूक केली असती तर आज त्याला 45 पटीने नफा मिळाला असता. याचा अर्थ असा की दहा वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना आज 45 लाख रुपये मिळाले असते. Multibagger Stock

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

कंपनीच्या शेअर्सवर 23% सूट

गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर होते. त्यावेळी एका शेअरची किंमत 1168.40 रुपये होती. मात्र, यानंतर त्यामध्ये लक्षणीयरित्या घट झाली. या वर्षी 20 जून रोजी तो विक्रमी उच्चांकावरून 43 टक्क्यांनी घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 669 रुपयांवर आला. यानंतर, त्याच्या किंमती पुन्हा सुधारू लागल्या आणि आतापर्यंत ते सुमारे 34 टक्के वर आले आहेत. शेवटच्या वेळी बाजार बंद होण्यापूर्वी बीएसईवर त्याची किंमत 895.40 रुपये होती. मात्र, 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावरून ते अजूनही 23 टक्क्यांच्या सवलतीवर आहे. Multibagger Stock

Watch out for the risks to your money- The New Indian Express

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे ???

आरती इंडस्ट्रीजची सद्याची आर्थिक स्थिती पाहता, चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-जून 2022 च्या पहिल्या तिमाहीत तिचा निव्वळ नफा 18.95 कोटी रुपयांवरून 18.58 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. मात्र याच कालावधीत कंपनीचा महसूल 171.77 कोटी रुपयांवरून 193.47 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock

Speciality Chemicals and Pharmaceutical Manufacturers India | AIL

आरती इंडस्ट्रीज बाबत जाणून घ्या

कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आरती इंडस्ट्रीज ही स्पेशॅलिटी केमिकल आणि फार्मा क्षेत्रासाठी API (अ‍ॅक्टिव्ह फार्मा इंग्रिडियंट) इत्यादींची आघाडीची उत्पादक आहे. कंपनीकडून फार्मा, एग्रोकेमिकल्स, पॉलिमर, एडिटीव्ह, पिगमेंट्स , सर्फेक्टेंट्स आणि डाईज तयार केले जातात. भारताशिवाय ही कंपनी इतर अनेक देशांमध्ये व्यवसाय करते. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.aarti-industries.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवे दर पहा !!!

Wi-Fi Calling म्हणजे काय ??? Android किंवा iPhone वर अशा प्रकारे सुरू करा

‘या’ प्लॅनअंतर्गत Vodafone Idea कडून दिला जात आहे 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा !!!

Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत बँका 5 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!