हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । post office कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या भचत योजना चालविल्या जातात. ज्यामध्ये देशातील लाखो लोकांकडून गुंतवणूक केली जाते. हे जाणून घ्या कि, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यावर कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तसेच याद्वारे चांगला रिटर्न देखील मिळतो. यामुळेच post office च्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. जर आपल्यालाही जोखीम नसलेल्या एखाद्या सरकारी योजनेत दीर्घकाळासाठी पैसे गुंतवायचे असतील तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना एक चांगला पर्याय ठरू शकेल.
हे लक्षात घ्या कि, post office च्या किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करून आपल्याला चांगला रिटर्न देखील मिळतो. ही भारत सरकारची डबल मनी योजना आहे ज्यामध्ये वार्षिक 6.9 टक्के व्याज दर मिळतो. तसेच तो 124 महिन्यांत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होतो. भारतातील बहुतेक पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना उपलब्ध आहे.
किसान विकास पत्र योजना म्हणजे काय ???
भारत सरकारकडून दिली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही एक बचत योजना आहे. या योजनेमध्ये जास्त व्याजदरांसहित मॅच्युरिटीवर भरपूर रिटर्न मिळतो. जोखीम नसलेली भारत सरकारची ही चांगली गुंतवणूक योजना आहे. जी आपल्या नागरिकांना दीर्घकालीन बचत करण्यास प्रोत्साहित करते. post office
कोणाला गुंतवणूक करता येईल ???
18 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या कोणत्याही नागरिकाला किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये, किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच यामध्ये जस्तीच्या गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. किसान विकास पत्रामध्ये, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने कोणत्याही प्रौढाच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. तसेच अल्पवयीन व्यक्तीचे वय 10 वर्षे होताच त्याच्या नावावर खाते केले जाते. एवढेच नाही तर 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या तीन लोकांना जॉईंट अकाउंट उघडता येईल. post office
रिटर्नवर द्यावा लागेल टॅक्स
जर कोणी ही योजना एका वर्षाच्या आत बंद केली तर त्याला कोणत्याही प्रकारच्या व्याजाचा लाभ मिळणार नाही. post office ची ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणाऱ्या रिटर्नवर टॅक्स द्यावा लागेल. मात्र, या योजनेत TDS कापला जात नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/saving-schemes/kisan-vikas-patra/
हे पण वाचा :
Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!
Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!