Post Office Scheme | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन चालू होते. म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी त्यांना दर महिन्याला काही ठराविक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. त्यावेळी त्यांच्या भविष्याची चिंता नसते. मात्र ज्यांना ही नोकरी नसते. त्यांना मात्र भविष्याची त्यांना नेहमीच काळजी असते. परंतु आता त्याचे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. कारण आता पोस्ट कार्यालय आणि पेन्शन सारखी लाभ देणारी एक मासिक बचत योजना सुरू केली आहे याचा लाभ सगळेच घेतात.
पती आणि पत्नीने जर ही मासिक बचत योजना सुरू केली. तर त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना अजिबात आर्थिक चणचण भासणार नाही. या योजनेत चार टक्के व्याज मिळणार असून दर महिने पैसे गुंतवणूक केल्यास ते व्याज तुमच्या खात्यात जमा होते. शेतकरी पती-पत्नी या योजनेत भाग घेऊ शकतात.
हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यास त्यावर पुन्हा तुम्हाला चार टक्के व्याज दिले जाते. किमान 1000 रुपयांपासून तुम्ही या योजनेबद्दल गुंतवणूक करू शकता. त्यामुळे अनेक जण या योजनेला त्यांची पसंती दर्शवित आहेत.
काय आहे मासिक बचत योजना ?
या मासिक बचत योजनेमध्ये एकावेळी गुंतवणूक करतात. दर महिन्याला व्याज मिळते या योजनेचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांना घेऊन घेता येतो. या योजनेत फिक्स डिपॉझिट सारखा व्याजदर मिळतो.
दोन प्रकारचे खाते | Post Office Scheme
वैयक्तिक खाते – या वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त 9लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ही गुंतवणुक 1000 रुपयांपासून सुरुवात करावी लागते.
संयुक्त खाते – या खात्यात दोन अथवा तीन व्यक्ती पैसे गुंतवतात. यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची मर्यादा आहे.
किती वर्षासाठी गुंतवणूक ?
या योजनेमध्ये कमीत कमी 5 वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. एक वर्षातच या योजनेतून माघार घेता येत नाही. जर तुम्ही मुदतीपूर्वीच पैसे मागितले तर किमान 2 टक्के रक्कम तुमची कपात केली जाते..
या योजनेमध्ये किती लाभ होईल?
- या योजनेमध्ये जर तुम्ही 5 लाख गुंतवले तर वर्षाला 3696 रुपये मिळतात टेन्शन प्रमाणे प्रत्येक महिन्याला 3083 रुपये मिळतात.
- एका व्यक्तीने जर 9 लाख गुंतवले तर त्याला वर्षाला 66 हजार 600 रुपये मिळतात. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 5550 रुपये मिळतात.
- 15लाख रुपये गुंतवले तर प्रत्येक वर्षाला 1 लाख 11 हजार म्हणजेच दर महिन्याला 9250 रुपये मिळतात.