हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून नागिरकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालविल्या जातात. ज्यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला रिटर्न देखील मिळतो. पोस्ट ऑफिसकडून चालवली जाणारी टाईम डिपॉझिट स्कीम ही अशीच एक जबरदस्त योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजाचा लाभ दिला जातो. पोस्ट ऑफिसकडूनही बँकांप्रमाणेच एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सची सुविधा दिली जाते. मात्र पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिट्सला टाइम डिपॉझिट असे म्हंटले जाते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट्समध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर दिला जातो.
काही दिवसांपूर्वीच, सरकारने टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता यामध्ये गुंतवणूकदाराला वार्षिक 6.7 पर्यंत व्याज दिले जात आहे. या योजनेची खास बाब अशी कि, गुंतवणूकदाराला यामध्ये अल्पकालावधीसाठी आणि दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते.
कोणाकोणाला खाते उघडता येईल ???
कोणत्याही भारतीय नागरिकाला Post Office टाइम डिपॉझिट स्कीममध्ये खाते उघडता येते. इतकेच नाही तर यामध्ये 3 प्रौढ व्यक्ती देखील एकत्रित खाते उघडू शकतात. तसेच 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने पालकांना टाइम डिपॉझिट खाते देखील उघडता येईल. यामध्ये 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे खाते उघडता येते.
इतके व्याज मिळेल
जर एखाद्याने या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी पैसे जमा केले तर त्याला वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज मिळेल. तसेच तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट्सवर, गुंतवणूकदाराला 5.8 टक्के दराने व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे 2 वर्षांच्या टाईम डिपॉझिट्सवर 5.7 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट्सवर सर्वात कमी व्याज म्हणजेच 5.5 टक्के व्याज दिले जाते. Post Office
अशा प्रकारे मिळेल टॅक्समध्ये सूट
Post Office मध्ये 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळेल. मात्र, यापेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर कर सवलत दिली जात नाही. टाईम डिपॉझिट्समध्ये मुदती आधीही पैसे काढता येतील, मात्र यावर काही दंड द्यावा लागेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण, आजचे दर तपासा
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत दिला 1920% रिटर्न