नवी दिल्ली । पोस्ट ऑफिस विविध प्रकारच्या टपाल सेवा तसेच अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा देते. पोस्ट ऑफिसमध्ये वृद्धांसाठी देखील योजना आहे. यामध्ये बँक एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. होय, पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली योजना आहे. ही पोस्ट ऑफिस योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित गुंतवणूकिचा पर्याय आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. मॅच्युरिटीनंतर ही योजना 3 वर्षांसाठी वाढवता येते. या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
मॅच्युरिटीवर 7 लाख कसे मिळवायचे ते जाणून घ्या
जर एखाद्या ग्राहकाने या पॉलिसीमध्ये दरमहा 8,334 रुपये मंथली जमा केले, तर खात्याच्या पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर त्याला सुमारे 7 लाख रुपयांची रक्कम मिळते. प्रत्येक महिन्याला 8,334 रुपये जमा केल्यावर वर्षभरात एक लाख रुपये जमा होतील. म्हणजे 5 वर्षात जमा केलेली रक्कम 5 लाख रुपये होईल. व्याजासह ही रक्कम 6,85,000 रुपये असेल.
आपण खाते कधी उघडू शकतो?
खाते उघडण्यासाठीचे वय 60 वर्षे आहे मात्र स्वेच्छानिवृत्ती घेणारी व्यक्ती ज्याचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे परंतु 60 वर्षांपेक्षा कमी आहे ते देखील हे खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत या खात्यात एकदाच पैसे जमा करावे लागतील.
या खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतील. जमा करावयाची रक्कम ही सेवानिवृत्ती लाभांच्या रकमेपेक्षा जास्त नसावी. या खात्यात 1000 रुपयांच्या पटीत पैसे जमा केले जाऊ शकतात.
पोस्ट ऑफिसमध्ये SCSS खाते कसे उघडावे ?
तुम्ही सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडू शकता. SCSS खात्यातून मिळणारे व्याज त्याच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकदाराच्या लिंक केलेल्या बचत खात्यात आपोआप जमा होते.
गुंतवणुकीतून टॅक्स बेनिफिट
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत आयकर कपातीचा लाभ मिळतो. SCSS वरील व्याज पूर्णपणे करपात्र आहे. एका आर्थिक वर्षात कमावलेली व्याजाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, मिळालेल्या व्याजावर टॅक्स डिडक्शन (TDS) लागू होईल. SCSS गुंतवणुकीवर TDS कपातीची ही मर्यादा 2020-21 पासून लागू आहे.
इतर सुविधा
या योजनेत नॉमिनेशन फॅसिलिटीही उपलब्ध आहे. खातेदार एक किंवा जास्त लोकांना खात्याचे नॉमिनी करू शकतो. मध्येच पैसे काढायचे असतील तर एक वर्षानंतर SCSS मधून पैसे काढता येतात, मात्र त्यासाठी दंड भरावा लागतो.