Wednesday, October 5, 2022

Buy now

कोल्हापूरमधील फोंडा घाटात टँकर चालकाचा खून

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमधील राधानगरी ते फोंडा घाटदरम्यान असणाऱ्या शेळप बाबरजवळ एका टँक़र चालकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तरलोकसिंग धरमसिंग असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या ट्रकचालकाचा मृतदेह टँक़रच्या केबीनमध्ये आढळून आला आहे. मृत टँकर चालक हा पंजाबमधील रहिवाशी आहे. राधानगरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
राधानगरी फोंडा राज्यमार्ग 178 वर शेळप बांबर दरम्यान रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेलेल्या टँकर क्र. पीबी 06 बीए 7626 च्या केबीनमध्ये तरलोकसिंग धरमसिंग या चालकाचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिसांनी अधिक तपास केला असता मृतदेहाच्या डोक्यावर, कानामागे वार झाल्याचे आढळून आले. दोन अज्ञात व्यक्तींनी हा खून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हि घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले असून त्याच्या आधारावर आरोपींना लवकरच अटक केले जाईल असे राधानगरी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास राधानगरी ठाण्याचे पोलिस निरिक्षक आप्पासो कोळी, उपनिरीक्षक नजीरखान, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश मेटील, कृष्णा यादव हे करत आहेत.