नितीन देसाईंचा पोस्ट मॉर्टम अहवाल समोर; मृत्यूचे कारण आले उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या ( Suicide) करून आपले जीवन संपवून घेतले. कर्जत येथे असलेल्या त्यांच्याच एन डी स्टुडिओत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितिन देसाई यांनी अचानक आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत देखील खळबळ उडाली. या सगळ्यात कालपासून त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लाविण्यात येत होते. आता नितिन देसाई यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem Report) समोर आला आहे.

पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये काय म्हंटल –

बुधवारी पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवला होता. यानंतर रुग्णालयातील 4 डॉक्टरांच्या पथकाने देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. तसेच याचा रिपोर्ट पोलिसांच्या ताब्यात देखील दिला आहे. या अहवालानुसार, नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास लावल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मृत्यू संदर्भात इतर कोणतेही दुसरे कारण आढळून आलेले नाही. नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव पुन्हा ND स्टुडिओत आणले जाणार आहे. या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडेल. काही वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नितीन देसाई यांचा फोन ताब्यात घेतला असून त्यामध्ये काही ऑडिओ क्लिप हाती लागल्या आहेत.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली होती. बुधवारी सकाळी स्टुडिओतील एका कर्मचाऱ्याने कर्जत पोलीस स्टेशनला फोन करून देसाई यांच्या आत्महत्येची माहिती दिली होती. यानंतर त्वरित पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्व परिसराची पाहणी केली होती. मात्र यावेळी त्यांना कोणतीही सुसाईड नोट वा संशयास्पद गोष्ट हाती लागली नाही. आता त्यांच्या शवविच्छेदन अहवालात ही मृत्यूचे कारण फाशी सांगितले आहे.

लगान, देवदास सारख्या चित्रपटासाठी काम केलं –

नितीन देसाई यांनी १९८७ च्या काळात सर्वात प्रथम  चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांचे कला दिग्दर्शन केले. लगान, देवदास, जोधा अकबर अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी कलाविश्र्वात काम केले. आज त्यांच्या जाण्याचे सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड सुन्न झाले आहे.