हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पैठण येथील श्रीनाथ षष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे. असा अध्यादेश आज (दि.10) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 4 ते 5 लाख भाविकभक्त पैठण येथे श्रीनाथषष्ठी महोत्सवाला येतात. मात्र यंदा संपूर्ण देशासहित महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे श्री नाथषष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे.
कोरोनाची लागण होऊन जगभरात 3817 लोक दगावले आहेत. तर भारतात 43 लोकांना लागण झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. दरम्यान 14 मार्चला षष्ठी महोत्सवाला सुरवात होणार होती. मात्र कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे खबरदारी दारी म्हणून श्रीनाथ षष्ठी महोत्सवाला स्थगिती देण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिंनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीन आणि हाँगकाँगहून परतलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. कोरोनाची लागण नये म्हणून सरकारनेही विशेष काळजी घेतली आहे.