Pradhan Mantri Mudra Yojana : Business साठी 10 लाख रुपये मिळवा; मोदी सरकारची जबरदस्त स्कीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिकांच्या (Pradhan Mantri Mudra Yojana) हितासाठी आणि तरुण वर्गाला व्यवसाय करण्यासाठी चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्याचबरोबर देशातील स्टार्टअप्स आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून एक खास योजना सुद्धा आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून सरकार ग्रामीण भागात बिगर- कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. या कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण द्यावे लागत नाही.

केंद्रातील मोदी सरकारने एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री (Pradhan Mantri Mudra Yojana) मुद्रा योजना (PMMY) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, बिगर-कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु/ सूक्ष्म उद्योगांना 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला देशभरातील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक नव्या दमाच्या तरुणांनी मुद्रा योजनेतून नवनवे व्यवसाय सुरु केले आहेत. आत्तापर्यंत या योजेनच्या माध्यमातून 8 वर्षांत सरकारने सुमारे 31 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

जामीनदाराची गरज नाही- (Pradhan Mantri Mudra Yojana)

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत (Pradhan Mantri Mudra Yojana) एकूण तीन श्रेणींमध्ये कर्जाचे वाटप केलं जाते. यामध्ये यात ‘बाल कर्ज ‘, ‘किशोर कर्ज ‘ आणि ‘तरुण कर्ज ‘ चा समावेश आहे. यातील शिशू अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. आणि तरुण अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तुम्ही पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केल्यास जामीनदाराची गरज नाही. तसेच यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

इथे करा Apply –

मुद्रा कर्ज योजनेसाठी सरकारी बँका, (Pradhan Mantri Mudra Yojana) खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकाकडे अर्ज करता येतो. मुद्रा योजनेंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे कर्ज मिळते. ऑफलाईन कर्जासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. तसेच ऑनलाईन कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ अथवा www.udyamimitra.in ला भेट देऊ शकता. याठिकाणी अर्ज डाउनलोड करता येईल. तो अर्ज भरून तुम्ही अप्लाय करू शकता.