Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | आपले सरकार हे सामान्य नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवल्या जाता. त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) सरकारच्या या योजनेअंतर्गत अपघाती विमा पॉलिसी अंतर्गत अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास व्यक्तीला रकमेसाठी दावा केला जातो. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. यासाठी तुम्हाला वर्षाला केवळ 12 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागणार आहे. आता ही योजना काय आहे? या योजनेची पात्रता काय आहे आणि तुम्ही कोण या योजनेसाठी अर्ज करू शकता याची सविस्तर माहिती घेऊया.
सरकारने प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेची (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) सुरुवात ही 2015 मध्ये केली होती. या योजनेचा उद्देश हा जास्तीत जास्त लोकसंख्येला सुरक्षा विमा देणे हा होता. यासाठीच वार्षिक प्रीमियम खूप कमी ठेवला होता. जेणेकरून गरीब व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकेल. या योजनेमध्ये तुम्हाला केवळ बारा रुपयांचा प्रीमियर भरावा लागतो.
या योजनेचा विमा काढल्यानंतर तुम्हाला कोणत्याही अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. त्याचप्रमाणे गंभीर दुखापत किंवा अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये प्रदान केले जातात. या विम्याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते या योजनेचा प्रीमियम 1 जून पूर्वी तुमच्या खात्यातून कापला जातो.
कोण घेऊ शकतो फायदा | Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
सरकारने मुळातच गरीब आणि मागासवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही विमा योजना सुरू केली आहे. जेणेकरून गरीब लोकांना कमी खर्चात विमा सुरक्षा योजनांचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक नागरिक असणे गरजेचे आहे. त्यासोबत मागासवर्गीय तसेच गरीब वर्गातील पाहिजे तरच त्याला अर्ज करता येतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 दरम्यान असणे गरजेचे आ हे ज्या बँकेत ऍटो डेबिट सुरक्षा सक्रिय आहे. त्यापैकी बँकेत खाते देखील असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरावा लागतो. (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana)