हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रथमच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट एकामागून एक असे सलग प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांना थेट सवाल केलेत. सिल्वर ओक वरील बैठकीत तुमचं काय ठरलं होते हे मला माहित आहे असं म्हणत मला अकोल्यात पाडण्याचा तुमचा डाव होता असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसेच त्यांनी ट्विट मध्ये खंजीर खुपसल्याचा फोटो शेअर केलाय. त्या हातावर संजय राऊत यांचे नाव लिहिण्यात आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काय सवाल केले??
संजय, किती खोटं बोलणार! तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक्स येथील मीटिंगमध्ये तुमची भूमिका काय होती ते आम्हाला माहीत आहे! अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे आघाडीची चर्चा करायची आणि दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे कारस्थान करत आहेत हेच तुमचे विचार आहेत का?? असे तिखट सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
संजय, कितना झूठ बोलोगे!?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 28, 2024
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी… pic.twitter.com/EMbHh6VFME
संजय राऊत आज सकाळी काय म्हणाले?
आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संजय राऊत यान प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आणखी चर्चा करत आहोत. भाजपाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फायदा होईल असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत. आमची लढाई ही संविधान वाचविण्याची आहे, हुकूमशाही विरोधात ही लढाई आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहभागा शिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही असं राऊतांनी म्हंटल होते.