Saturday, March 25, 2023

८ दिवसांत मंदिर खुली करू! उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन घेतलं मागे

- Advertisement -

पंढरपूर । राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन मागे घेतलं. विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंदिरं खुली करण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करु असा इशारा यावेळी दिला.

विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ८ दिवसांत नियमावली तयार करुन मंदिर खुली केली जातील असं आश्वासन मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केली जातील असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून त्यासाठी आठ दिवस लागतील असं सांगितलं आहे. पण जर आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

वंचितच्या आंदोलनाला यश आलं असून लोकभावनेचा आदर केल्याने सरकारचा आभारी असल्याचंही ते म्हणाले आहेत. ८५ टक्के लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचं कशाला ? अशी विचारणा करताना पुन्हा या प्रश्नावर लढायला आम्हाला लावू नका असंही ते म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.