काँग्रेसने केवळ कामाची पाटी लावली तर भाजपने अनेक कंपन्या बंद पाडल्या -प्रकाश आंबेडकर

0
57
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी । ज्यावेळी काँग्रेसची सरकार होती त्यावेळी त्या सरकारने प्रत्यक्षात विकास कामे करण्याऐवजी केवळ त्या कामाची पाटी लावण्याचे काम केले आहे. तर आजच्या भाजपच्या राजवटीत या सरकारने अनेक कंपन्या बंद पाडून राज्यातील जवळपास आठ लाख कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज संधी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, आमचा पक्ष तुमच्यासाठी कार्य करेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उमरगा  येथील सभेत केले.

उमरगा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार रमाकांत गायकवाड यांच्या प्रचारासाठी उमरगा येथे प्रकाश आंबेडकर यांची आज सभा झाली या सभेत त्यांनी तत्कालीन काँग्रेस आणि आजच्या भाजप सरकरकारच्या कार्यकाळातील धोरणाबद्दल टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here