मुंबई प्रतिनिधी | भाजप हा मित्र पक्षाच्या नावाखाली शिवसेनेला खल्लास करणार आहे याची उद्धवठाकरे यांनी घ्यावी अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये चालेल्या सुक्त युद्धावर जयंत पाटील यांनी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर सध्या पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप संस्थांच्या चौकशीची भीती दाखवीत आहेत . त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते तडकाफडकी भाजमध्ये प्रवेश करीत असल्याचा आरोप ,पाटील यांनी केला . सर्व मार्गांचा अवलंब करून कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकविणारा भ्रष्ट राजकीय पक्ष म्हणून भाजप ओळखला जाईल, असेही ते म्हणाले .
लोकसभा निवडणुकीत आघाडीला पराभव सहन करावा लागला आहे . मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला गळती लागली आहे. अनेक नेते मंडळींनी पक्षाला राम राम ठोकत भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे