Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; लोकसभेसाठी ‘या’ मतदारसंघातून अर्ज भरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून अजूनही तिढा कायम असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर अकोला मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या २७ तारखेला ते अर्ज भरणार आहेत. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच महाविकास आघाडीबाबत आमची भूमिका २६ तारखेला जाहीर करू असेही त्यांनी म्हंटल आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेना निया काँग्रेसमध्ये जागावाटपावरून काही वाद आहेत, ते त्यांनी मिटवावे.. आमच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बाधा येतेय असं काही नाही. आधी तुमच्यातील १५ जागांवरून असलेला वाद मिटवा. वंचित बहुजन आघाडी आम्हाला साथ देत नाही असं जो कोणी महविकास आघाडी कडून बोलत आहे त्यांनी आधी हे स्पष्ट करावं कि काँग्रेस आणि शिवसेनेतील १५ जागांवरील वाद संपुष्टात आली असे आव्हानही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिले.

भाजपवरही टीका – Prakash Ambedkar

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही टीकेची तोफ डागली. मला १९५० साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेली शपथ आजही आठवतेय. त्याचा सगळं रेकॉर्डही आहे कि आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही संविधान बदलू. त्यामुळे भाजपवाले जे आत्ता ४०० पारचा नारा देत आहेत ते संविधान बदलण्यासाठी चाललं आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केला. राज्यशासन करायचं असेल तर तुमच्याकडे ३०० जागा असल्या तरी तुम्ही सरकार चालवू शकताय, मात्र भाजपवाले ४०० म्हणत आहेत ते संविधान बदलण्यासाठीच यावर आता लोकांचा विश्वास बसू लागलाय असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.