राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकर न्याय यात्रेत सहभागी होणार; मात्र या प्रमुख अटींवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याबाबत चर्चा रंगली आहे. अशातच दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना पत्र लिहीत भारत न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारले असले तरी त्यांनी काँग्रेस पुढे काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्या तरच प्रकाश आंबेडकर न्याय यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

लोकांचे प्रश्न रस्त्यावर उतरून जाणून घेण्याची भूमिका घेत राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी न्याय यात्रेची घोषणा केली आहे. आता या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित केल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांनी देखील राहुल गांधींच्या या निमंत्रणाला ट्विट करत उत्तर दिले आहे.

ट्विटमध्ये काय म्हणले?

प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींसाठी दोन पाणी पत्र लिहीत आपली भूमिका मांडली आहे. या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “मला राहूल गांधी यांच्या कडून भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. परंतु अद्याप VBA ला INDIA आघाडी आणि MVA मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे मला या यात्रेत सहभागी होणे अवघड जाईल”

तसेच, इंडिया आघाडीमध्ये वंचित सामील झाली नसताना देखील या यात्रेत सहभागी झाल्यास अनेक वेगळे अर्थ काढले जातील. त्यामुळे माझी राहुल गांधींना विनंती केली आहे की, त्यांनी वंचितला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवावे” अशी प्रमुख अट प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या पुढे ठेवली आहे. आता ही अट राहुल गांधी मान्य करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत आणि महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यासाठी तिन्ही पक्षांकडून सहमती दाखवण्यात आली आहे. परंतु अद्याप वंचितला सहभागी केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना न्याय यात्रेचे निमंत्रण पाठवल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यांची आठवण करून दिली आहे.