भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहे, युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य (prakash ambedkar) केले आहे. भाजपाला जसे उद्धव ठाकरे नको होते तसेच त्यांना एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत, असे वक्तव्य त्यांनी (prakash ambedkar) केले आहे.

प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले?
येत्या काही दिवसांत महापालिका, नागरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटासोबत युती करते की नाही ते पहावे लागेल. जर परिस्थिती अनुकूल दिसली तरच भाजप शिंदे गटासोबत युती करेल. त्यामुळे भाजपाला जसे उद्धव ठाकरे नको होते तसेच त्यांना एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत. वैयक्तिक स्तरावर सुरू असलेलं राजकारण काही योग्य नाही. ही गादीची लढाई नाही, हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावं. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. तोच ठरवेल सत्ता कोणाच्या हातात द्यायची, असेदेखील ते (prakash ambedkar) यावेळी म्हणाले.

पोटनिवडणुकीवरून आरोप – प्रत्यारोप
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकारण तापले आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीवरून सध्या दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय