औरंगाबाद: कृष्णा पाटील डोंणगावकर यांनी साखर कारखान्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला असून यामध्ये साखर निर्यात घोटाळा, डॅमेज शुगर, सभासदांचा विश्वासघात करून 5 कोटी 41 लाख 622 रुपयांचा अपहार,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नोकरी घोटाळा केला असून कृष्णा पाटील डोंणगावकर यांच्या विरोधात 9 गुन्हे दाखल असून आपलेच लोक आपल्या मराठवाड्याचा साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना मदत करत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
राजकिय दबाव आणून आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारखान्याचे पैसे बँकेत असून एकही रुपया या खात्यातून काढण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे तळवे चाटून हा कारखाना बंद करण्यासाठी सुरू असलेला उद्योग आहे असा घणाघात आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेत केला. कारखाना डबघाईत आणून विक्रीसाठी काढण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील हे कोणतेही पुरावे नसतांना गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांवर दबाव आणत आहे.
कारखाना सुरू झाला पाहिजे, दुर्दैवाने राजकारणामुळे कारखाना बंद आहे. मतदारसंघातील काही गद्दारामुळे साखर कारखान्याचे दिवाळे निघाले आहे. 226 शेतकऱ्यांचे 2 कोटी 21 लाख रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. हा साखर कारखाना सुरू व्हावा अशी इच्छाही आमदार बंब यांनी यावेळी व्यक्त केली. कारखाना विक्री झाला तरी जो कोणी कारखाना घेणार असेल त्यांनी 14 हजार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा सभासदांना लाभ द्यावा असे ही यावेळी बंब यांनी बोलताना सांगितले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group