शिवरायांच्या वेशात राष्ट्रवादीच्या आमदाराची विधानभवनात एन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करत हटके आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोकळ आश्वासने देणाऱ्या सरकारचा निषेध केला. हातामध्ये तलवार घेऊन प्रकाश गजभिये विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठा-मुस्लीम-धनगर आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली. तसेच, बेमुवर्तखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा …’ असं पत्रकप्रकाश गजभिये यांनी आपल्या हातामध्ये धरलं होतं.

आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी विरोधकांनी मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केले आहे. भाजपने सत्तेवर येण्याआधी विविध आश्वासने दिली. मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचाही यात समावेश होता. मात्र, ती पूर्ण झाली नाहीत, असे म्हणत विरोधकांनी आंदोलन सुरू केले आहे.

 

Leave a Comment