मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणने म्हणजे देशातील जनतेचा अपमान; जावडेकरांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

rahul gandhi javdekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर तोफ डागली होती. नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकाश जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसोबत कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. मोदींच्या या प्रयत्नांबद्दल राहुल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान आहे. आम्ही त्यांच्यासाठी नौटंकी हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण त्यांची नौटंकी जनतेनं केव्हाच बंद केलीय.

राहुल गांधीचं विधाना नंतर एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे टूलकीट तुम्हीच निर्माण केलंय. ज्यापद्धतीच्या भाषेचा वापर, तर्क आणि लोकांमध्ये भीता पसरविण्याचा प्रयत्न, हा त्याच राजकारणाचा भाग आहे, असेही जावडेकर यांनी म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.