हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचे गूढ अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यांनतरच पहाटेचा शपथविधी पार पडला असा खुलासा फडणवीसांनी केल्यांनतर पुन्हा या चर्चाना तोंड फुटले. यावरून राज्यात सध्या आरोप- प्रत्यारोप सुरु असतानाच पहाटेचा शपथविधी हा फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेला लागलेला डाग आहे असं मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. ते औरंगाबादेत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
1978 ची घटना जशी शरद पवार यांच्यावरचा डाग म्हणून राहिली त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या सोबतच पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेला लागलेला डाग आहे. हा डाग देवेंद्र फडणवीस कधीही मिटवू शकणार नाहीत असं प्रकाश महाजन यांनी म्हंटल. फडणवीस म्हणतात कि मला २ वेळा धोका दिला, पण फडणवीस यांच्यासारखा चाणाक्ष माणूस 2 वेळा धोका कसा खाऊ शकतो असा सवालही त्यांनी केला.
ठाकरेंना 'ती' चूक महागात पडणार? हरिश साळवेंच्या युक्तिवादाने डाव फिरला??
वाचा सविस्तर-👉🏽https://t.co/9ehjPB40kO#Hellomaharashtra @mieknathshinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 15, 2023
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक सरकार आहे हे सुब्रह्मनम स्वामी यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणार नाही हे एकनाथ शिंदे याना तेव्हा माहित नव्हतं का? 2 वर्ष कस काय त्यांनी मंत्रिपद उपभोगलं ? असा सवाल करत सत्तेसाठी कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे हे जनतेला कळतच नाही. इथे प्रत्येकाच्या हातात सूरा आहे आणि प्रत्येकाच्या पाठीत वार आहेत असं प्रकाश महाजन म्हणाले.