हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्याच आमदारांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. असेही त्यांनी म्हंटल.
तुम्ही खूप छान काम केलेत सर! @OfficeofUT … आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील..चाणक्य आज लाडू खात असतील..पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो!’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले
You did great dear sir @OfficeofUT … and I’m sure people of Maharashtra will stand by you for the way you handled the state.. the Chanakya s may eat laddoos today.. but your genuinity will linger longer .. more power to you.. #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 10 वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील एकूण घडामोडीवर भाष्य करत आपला मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वेचाही राजीनामा दिला.उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.