काँग्रेसचे ‘मिशन गुजरात’ प्रशांत किशोर यांच्या हाती? चर्चाना उधाण

PK Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. त्याचाच भाग म्हणजे प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा काँग्रेस सोबत काम करणार असल्याचे समोर येत आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकी काँग्रेसचे मिशन प्रशांत किशोर यांच्याकडे असू शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात निवडणुकीत काम करण्यासाठी ऑफर राहुल गांधी यांना दिली आहे. मात्र किशोर यांच्या प्रस्तावावर काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. गुजरात काँग्रेसचे काही नेते श्री किशोर यांच्या सोबत काम करण्यास उत्सुक आहेत, मात्र अंतिम निर्णय राहुल गांधींवर अवलंबून आहे. यावर्षी डिसेंबर मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक असून काँग्रेस आत्तापासूनच तयारीला लागली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही. एका मुलाखतीत प्रियंका गांधी यांनी देखील कबूल केले होते की पीके काँग्रेसमध्ये सामील होणार होते परंतु काही मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली नाही.