हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशाच्या निवडणुकीत निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. सध्या प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडून अनेक प्रकारचे सल्ले हे काँग्रेसला दिले जात आहेत. मात्र, आता किशोर यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. त्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्याचू उपस्थिती होती. या सर्वानी अनेक मुद्यांसह प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाबाबतही चर्चा केली. अखेर सर्व चर्चेनंतर प्रशांत किशोर यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसकडून विचारमंथनही करण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेसकडून पुन्हा पक्ष मजबूत करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या जाऊ लागल्या आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दृष्टीनेही काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. उमा निवडणुकीत उत्तम जाणकार म्हणून प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहार.
प्रशांत किशोर निवडणुकीत बजावणार महत्वाची भूमिका
उत्तम निवडणूक रणनीतीकार आणि सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची ओळख आहे. त्यांनी आज पर्यंत दर्शवले अंदाज योग्य ठरले आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी प्रशांत किशोर यांनी बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. गट पाच दिवसांमध्ये किशॊर यांनी तब्बल चौथ्यांदा सोनिया गांधी याची भेट घेतली आहे.