पुरातत्व विभागाच्या गलथान कारभार : धोक्याची सुचना असताना प्रर्तापगडाकडे दुर्लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगडावरील मुख्य बुरजाच्या तटबंदीखालील मुख्य बुरजाच्या तटबंदीखीलील कडा कोसळला आहे. किल्ले प्रतापगडाच्या धोकादायक बुरुजाची सुचना लेखी प्रत्राने जिल्हाअधिकारी सातारा यांनी पुरातत्व विभागाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पत्र पाठवुन धोक्याची सुचना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुरातत्व विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात धोक्याची सुचना देवुनही किल्ले प्रतापगडाकडे दुर्लक्ष केलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कर्याकाळात न्याय मिळणार का? असा प्रश्न शिवप्रेमीतुन होवु लागली आहे.

प्रतापगडाच्या डागडुजीच प्रश्न प्रलबिंत असताना सातारा जिल्हा नियोजन विभागाकडुन प्रतापगड हा किल्ला पुरातन असुन सादर किल्ल्याच्या बुरुजाची व तडबंदीची मोठ्या प्रमाणात हानी झाली असुन त्यामुळे प्रतापगडावर पर्यटक व स्थानिक लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. संबधित गड किल्ले संवर्धन पुरातत्व विभागाची जवाबदारी असुन किल्ल्याची पुर्ण पाहणी करुन सवर्धनाची कामाची अदाजपत्रके शासनाकडे सादर करावे असे पत्र जिल्हाअधिकारी सातारा यांनी पुरातत्व विभागाकडे फडणवीस सरकारच्या काळात पाठवुन देखील कोणतीही कारवाई झाली नाही .


दरम्यान लोकप्रतिनीधी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा न करता बाधकाम विभागाकडे अंदाजपत्रक तयार करणार असल्याची बोळवण करत “जखम मांडीला अन् औषध शेडींला” असा प्रकार सुरु असुन शिवप्रेमीनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपतीचा ठेवा ढासळु लागला असताना प्रशासन गांधारीच्या भुमीकेत गेल्यामुळे किल्ले प्रतापगडाची योग्य ती काळजी घेतली पाहीजे अशी मागणी जोर घरपोच लागली आहे .