सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर; प्रतिक्षांची प्रेरणादायी कहाणी पहाच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हणतात ना कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. ते करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असावा लागतो. अशाच आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या सातवी पास असलेल्या मुंबईतील प्रतीक्षा तोंडवळकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगार म्हणून कामाची सुरुवात केली. मात्र, आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्यांची हि प्रेरणादायी कहाणी नक्की थक्क करणारी आहे.

37 वर्षांपूर्वी प्रतीक्षा तोंडवळकर या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयमध्ये सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या होत्या. आज त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरपदापर्यंत मजल मारली आहे. एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची त्यांची कहाणी विलक्षण आहे.

बँकेत होत्या चपराशी –

मुंबईतील प्रतीक्षा तोंडवळकर यांचा वयाच्या 17 व्या वर्षी सदाशिव कडू यांच्याशी 1981 साली विवाह झाला. त्यांचे पती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बायंडरचे काम करायचे. मात्र, 1984 साली त्यांच्या पतीचा आकस्मित मृत्यू झाला. त्यानंतर प्रतीक्षा तोंडवळकर यांचे संपूर्ण जगच हरपल होत. त्यावेळी त्यांचे केवळ 20 इतकं वय होतं. अशा अवस्थेत त्यांच्या पदरात दोन मुले होती. पतीची साथ सुटलेल्या प्रतीक्षा यांना त्यावेळी नेमकं काय करावं हेही कळत नव्हते. अशात आपले शिक्षण फक्त सातवी पर्यंत झाले असल्याने नोकरी कोणती शोधायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी खचून न जाता पती काम करत असलेल्या बँकेत त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची नोकरी करण्यास सुरुवात केली. पतीअसताना त्यांनी नेहमीच प्रतिक्षा यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित केले होते. आपल्या पतीचीच प्रेरणा त्यांनी आपल्यासोबत कायम ठेवली.

अपार कष्ट करून केले ध्येय साध्य –

57 वर्षीय प्रतीक्षा तोंडवळकर या आज एका प्रतिष्ठित सरकारी बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतात. मात्र, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम हे खूप मोलाचे आहेत. प्रतीक्षा तोंडवळकर या सध्या मुंबईत सांताक्रूझ या ठिकाणी राहत असून बांद्रा येथील प्रतिष्ठित सरकारी बँकेमध्ये जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.

ट्रैनी ऑफिसर म्हणून निवड –

प्रतीक्षा तोंडवळकर यांनी दहावी उत्तीर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात प्रवेश घेतल. या महाविद्यालयात त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कॉमर्समधून पदवी प्राप्त केल्यानंतर बँकेत त्यांना पहिल्यांदा क्लर्क म्हणून रुजू झाल्या. मात्र, क्लर्क म्हणून काम करत असताना देखील अंतर्गत परीक्षासाठी त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. अंतर्गत परीक्षा पास करून पहिल्यांदा त्या ट्रैनी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाल्या. त्यानंतर एकेक पदावर बढती मिळवत त्यांनी बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरची पदवी मिळवली. त्यांचा हा सर्व प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

मुलांनाही दिले उच्च शिक्षण –

प्रतीक्षा तोंडवळकर यांनी स्वतः शिकत असताना आणि आपल्या मुलांसाठी शिक्षण कुठे थांबू दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा विनायक मुंबई आयआयटी येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहे. तर, त्यांची मुलगी दीक्षा व्यवसाय करते. या दरम्यानच त्यांनी प्रमोद तोंडवळकर यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, आपल्या दुसऱ्या विवाहानंतर देखील त्यांनी आपली मुलं, जबाबदारी या चौख पार पाडल्या. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पती प्रमोद तोंडवळकर यांची मोलाची साथ त्यांना लाभली.

समस्या समोर राहताच दोन हात करायचे –

प्रतीक्षा तोंडवळकर यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगत तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहार. त्यांनी म्हंटले आहे कि समस्यांपासून पळून न जाता त्याच्याशी दोन हात करणे गरजेचे आहे, असे सांगत या समस्येतून आपणच मार्ग काढायचा असा निश्चय केला. त्या समस्येतून धैर्याने आपण बाहेर पडलो. मात्र, सध्याची तरुण पिढी लवकर नैराश्याच्या छायेत जाते. समस्येतून मार्ग काढण्याऐवजी समस्ये पासून दूर पळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, समस्या पासून दूर पळून समाधान मिळणार नाही प्रत्येक तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. समस्यांच्या मुळाशी जाऊन समस्या सुरू होतानाच ती मोठी होऊ नये, याची दक्षता सर्व तरुणांनी घेतली पाहिजे. तरुणांनी वास्तव्यात जगायला शिकले पाहिजे, असा सल्ला तोंडवळकर यांनी तरुणांना दिला आहे.