हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळात लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोरोना योध्दांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. तसेच मृत्यू झालेल्या कोरोना योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा, अशी देखील मागणी त्यांनी केली.
“कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचा मृत्यु झाला असे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे,” असे दरेकर यांनी म्हटले. तसेच, या कोरोना योध्दांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमविता व्यक्ती गमाविल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंतीही यावेळी दरेकर यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.