हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेली 30 वर्ष आम्ही एका सापाला दूध पाजले आणि तोच आम्हाला फुत्कारतोय अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक नावाच्या सापाविरोधात कारवाई करावी असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.
मला वाटत २५ वर्षांनी मुख्यमंत्र्यांना साप दिसला. माझी त्यांना एवढीच विनंती आहे कि आत्ता ज्या सापाने देशाच्या विरोधात फणा वर काढला आहे त्या सापाला तुम्ही कॅबिनेट मध्ये बसवलेत तर त्या सापाचा दंश तुम्हाला होईल आणि मुख्यमंत्र्यांना ते होऊ नये अशी आमची काळजी आहे त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या माध्यमातून जो साप वळवळतोय त्या सापाला ठेचून काढण्यासाठी मालिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
"मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक नावाच्या सापाच्या विरोधात कारवाई करावी."@CMOMaharashtra @nawabmalikncp #BudgetSession2022 #Maharashtra #NawabMalik pic.twitter.com/mvyfHHkIbn
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 3, 2022
दरम्यान, नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ झाली आहे. ७ मार्च पर्यंत त्यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विरोधकांकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र मलिक यांचा राजीनामा घेणार नाही या विचारावर ठाम आहेत.