हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँक मध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत राज्य सरकार कडून बँकेच्या चौकशीचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई बँक ही उत्तम काम करत असून बदनामी केल्याप्रकरणी 1 हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याचे दरेकरांनी म्हंटल आहे.
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. कारण मुंबै बँक आम्ही १२०० कोटींच्या टप्प्यावरून १० हजार कोटींवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुर्दैवाने काही जणांकडून झाले आहे. हे अयोग्य असल्यामुळे बँकेने कालच मुंबई उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे अशी माहिती प्रविण दरेकर यांनी दिली.
वैयक्तिक बदनामीबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही, आमची वैयक्तिक बदनामी करा, राजकीय बदनामी करा, मात्र, ज्या वेळेला एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी होते, त्यावेळेला त्यांच्या डिपॉझिटरवर परिणाम होतो, ग्राहकांवर परिणाम होतो, त्याच्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचे पोट त्याच्यावर असते. उद्या जर एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी थेट विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे.