यंदा देशात सर्वसाधारण तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

पुणे : देशभरात यंदा मान्सूनचा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सरासरीच्या 98 टक्के नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. यामध्ये परिस्थितीनुरूप पाच टक्के कमी-अधिक स्वरूपात तफावत असेल. दरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात चांगला पाऊस

मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने राज्यनिहाय पडणाऱ्या संभाव्य पावसाची स्थिती दर्शवणारा नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाड्यासह दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 35 ते 55 टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरित राज्यात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रात गतवर्षाच्या अखेरच्या टप्प्याला निनो स्थिती निर्माण झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ती सर्वोच्च स्थितीवर पोहोचली होती. मात्र 2019 च्या सुरुवातीला ला -नीना स्थिती निवळण्यास सुरुवात झाली आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत जाणार आहे. मात्र मान्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्स नुसार मान्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात महासागराचे तापमान सामान्य राहण्याचे संकेत आहेत. यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक सध्या सर्वसामान्य आहे. मान्सून हंगामात हीच स्थिती नकारात्मक पातळीकडे झुकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like