महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा’! जितेंद्र आव्हाडांची नरेंद्र मोदींना विनंती

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेमडिसिविर आणि ऑक्सिजनची वारंवार मागणी राज्यातील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींकडे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहून ऑक्सिजनची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत भावनिक ट्विट करत पंतप्रधान यांच्याकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ महाराष्ट्राच्या वतीने मी भीक मागतो की आपण ऑक्सिजनचा पुरवठा करा’.सध्या जगण्यासाठीची ती गरज झाली असल्याची आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा म्हणून राज्य सरकार वारंवार विनंती करत आहे. त्यामुळे या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र सर्वसामान्य जनता यात संकटात होरपळतांना दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like