हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीएम किसान योजनेबाबत नुकतीच एक दिलासादायक माहिती दिली आहे.
महिलांना मिळणार 54,000 कोटी रुपये
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की,”PM Kisan सन्मान निधीच्या लाभार्थ्यांमध्ये जवळपास तीन कोटी महिला आहेत. ज्यांना आतापर्यंत एकूण 54,000 कोटी रुपयांहून जास्त निधी दिला गेला आहे. तसेच या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटी रुपयांहून जास्तीचा निधी देण्यात आला आहे.”
महिला शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना
त्या पुढे म्हणाल्या की,” देशातील 11 कोटी छोटे शेतकरीही माझ्या सरकारच्या प्राधान्यक्रमात आहेत. हे छोटे शेतकरी अनेक दशकांपासून सरकारच्या प्राधान्यापासून वंचित होते. आता त्यांना मजबूत आणि समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.” PM Kisan
सरकार देत आहे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
त्या पुढे म्हणाल्या की,” लहान शेतकऱ्यांसाठी पीक विमा, मृदा आरोग्य कार्ड, किसान क्रेडिट कार्डचा प्रसार वाढवण्याबरोबरच सरकारने पहिल्यांदाच पशुपालक आणि मच्छीमारांनाही किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेशी जोडले आहे. भारताने एकीकडे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे नॅनो युरियासारखे आधुनिक तंत्रज्ञानही विकसित केले आहे. PM Kisan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/
हे पण वाचा :
New Business Idea : सतत मागणी असलेल्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये
Investment Tips : ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मुलांच्या भविष्यासाठी जमवा लाखो रुपये
Flipkart Sale मध्ये 1500 रुपयांपेक्षा कमी किंमतींत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन
Business Idea : वर्षभर मागणी असणाऱ्या ‘या’ वस्तूच्या व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न !!!
Financial Changes : 1 फेब्रुवारी 2023 पासून ‘या’ नियमांत होणार बदल,याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होईल ते पहा